Pune : पुण्यात तुफान पाऊस; रस्त्यांवर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज सायंकाळी सहा वाजता तुफान पाऊस झाला. पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग दाटून आले. कमी वेळात जास्त पाऊस झाला. त्यामुळे शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, अलका चौक, सिंहगड रोड, भांडारकर रस्ता परिसरात दूरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.

पुणेकरांनी पाऊस थांबून, पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले. सिंहगड रोड, एनडीए, टिळक रोडसह शहरातील काही भाग आणि उपनगरांत वीजही गायब झाली. त्यामुळे पुणेकरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. टिळक रस्त्यावर कॉलेजसमोर ग्राहक पेठ येथे पीएमपीएमएलवर झाड कोसळले. मुंबई पेक्षा भयानक परिस्थिती पुण्यात निर्माण झाली होती. शहरात काही रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या. शहरात पाणी तुंबण्याला पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.