Chikhali : चिखली ठाण्यासाठी मिळणार जागा, निलेश नेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – चिखली पोलीस ठाण्यासाठी घरकुल प्रवेशद्वारा शेजारील मोकळी जागा देण्यास महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यास हक्काची जागा मिळणार आहे. पोलीस ठाण्याला जागा मिळावी यासाठी भाजपचे कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

Pimpri : एमआयडीसीतील कामगारांना मिळणार रात्रपाळीत शिक्षण

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्राप्त सुधारित बांधकाम परवानगीनुसार चिखली से. क्र. १७ व १९ येथील प्रकल्पामधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील उजव्या बाजूची २६७१. ७८ चौ. मी. इतकी जागा खेळाचे मैदान आरक्षण विकसित करण्याकरिता आरक्षित आहे.

त्या जागेतील एकूण १५ गुंठे जागा पोलीस स्टेशनच्या उभारणीकरता उपलब्ध करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यामुळे चिखली स्टेलीस स्टेशनला हक्काची जागा मिळाली आहे.

नेवाळे म्हणाले,  पिंपरी-चिंचवड महापालिकेने राबविलेल्या महत्वाकांक्षी घरकुल प्रकल्पात आज जवळपास ३०,००० नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमणात नागरिक वास्तव्यास असल्याने येथे वारंवार गुन्हेगारीचे प्रकार वाढत आहे.

त्यात काही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून भविष्यात ही गुन्हेगारी संपुष्टात आणायची असेल तर या ठिकाणी पोलिस स्टेशन असणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याला जागा मिळण्याकरिता प्रयत्न केले.

घरकुलच्या प्रवेशद्वारा शेजारील मोकळी जागा चिखली पोलिस स्टेशनसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणी चिखली पोलीस स्टेशनची उभारणी करता येणार असून घरकूल सुरक्षित होण्यास मदत होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.