Nigdi : प्रीपेड टास्कचे काम देऊन महिलेची 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्रीपेड टास्कचे काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 14 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 ते 17 जून या कालावधीत आकुर्डी येथे घडली.

Chikhali : चिखली ठाण्यासाठी मिळणार जागा, निलेश नेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरुची विषणवाणी, राहणा दाणा, दिव्या, लेव्ही दिनेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना युट्युबचे व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. त्यानंतर प्रीपेड टास्कचे काम देऊन त्यातून पैसे मिळतील असे आमिष दाखवले. महिलेकडून प्रीपेड टास्कसाठी 14 लाख 40 हजार 903 रुपये घेत फसवणूक करण्यात आली. निगडी (Nigdi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.