Supriya Sule – मुंबई – पुणे एक्स्प्रेस मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याची मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे यांची विनंती

एमपीसी न्यूज – मुंबई – पुणे या शहरांना जोडणा-या (Supriya Sule) यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस महामार्गावर प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांनी या मार्गावरील वाहतूकीकडे लक्ष देऊन तातडीने हा प्रश्न सोडवावा, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट टाकली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांना टॅग करण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,‘यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे वरुन मुंबई ते पुणे हा प्रवास करीत असताना घाटामध्ये प्रचंड वाहतूक (Supriya Sule) कोंडी होते. यापुर्वी हा रस्ता प्रवासासाठी अतिशय उत्तम असा होता. परंतु, अलिकडे या रस्त्याने प्रवास करताना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Pune : उत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी – गोपाळ तिवारी

यात वेळ, पेट्रोल-डिझेल वाया तर जातेच याशिवाय पर्यावरणाचेही नुकसान होते. राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालून प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा ही विनंती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.