Pune : उत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – उत्तराखंड टनेल मधील खोदकाम करणाऱ्या 41 कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातून’ सुटका (Pune) झाल्याचे सर्व देशाने पाहिले. त्याबद्दल 17 दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले. त्या सर्वांचे अभिनंदन व आभार..! मात्र ‘मजुरांवर ही जीवधेणी परिस्थिती कां ओढावली याची चौकशी ही झाली पाहीजे. या टनेल’चे खोदकाम करणाऱ्या ‘नवयुग इंजिनिअरींग कंपनीवर’ सरकार काय कारवाई करणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

या टनेल’चे खोदकाम ‘नवयुग कंपनीस’ देतांना, त्यांची तांत्रिक क्षमता व अनुभव पाहीले गेले काय ? सदर ‘नवयुग कंपनी’ या मजुरांच्या जीवाशी खेळत होती काय? मजुरांच्या जीवाच्या सुरक्षेच्या कोणत्याही ऊपाय योजनांची आखणी करणे सदर कंपनीस गरजेचे का वाटले नाही? नैसर्गिक व पर्यावरणाचे नियम व संकेत तुडवले गेले काय? असे अनेक प्रश्न समोर येत असून मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व अक्षम्य बेपर्वाई करणाऱ्या (व अड़ानी ग्रुप’च्या अधिपत्याखाली असल्याचा आरोप होणाऱ्या) ‘नवयुग इंजिनीअरिंग कंपनी’वर सरकार काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करून या दुर्घटनेची जबाबदारी सरकार कोणावर निश्चित करणार? हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली.

Punawale : नियोजित कचरा डेपो विरोधात 3 डिसेंबर रोजी पुनावळे येथे घंटानाद आंदोलन

या टनेल’च्या कामात, ‘मजुरांच्या सुरक्षेची तांत्रिक पुर्व तयारी’ सदर कंपनीने काय व कशा प्रकारे केली होती? त्या ठिकाणी (Pune) अत्यावश्यक असणारे ह्युम पाईप का लावले गेले नाहीत? सदरचे खोदकाम करण्याच्या कामातील तांत्रिक सुरक्षेच्या बाबींकडे का दुर्लक्ष करण्यात आले? या बाबी स्पष्ट होऊन दोषींवर तातडीने सक्त कारवाई होणे गरजेचे आहे.

अन्यथा कोणाच्या तरी अक्षम्य बेपर्वाईमुळे असे प्रकार पुढील काळात ही घडू शकतात. त्यामुळेच  उत्तराखंड टनेल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळ तिवारी यांनी केली.

मध्यंतरी गुजरात मधील मोरवी पुलाची दुर्घटना ही दुर्लक्षीत होऊन दोषींवर कारवाई झाल्याचे पहावयास मिळाले नाही, ही दुर्दैवी बाब असून संकट पश्चात काळजी घेण्याऐवजी संकटपुर्व खबरदारी व नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या जबाबदार सरकारांचीच देशाला खरी तर गरज आहे.

गेल्या 70 वर्षात सरकारच्या बेर्पाईमुळेच, देशांतर्गत पुलवामा, मोरवी, रेल्वे अपघात, उत्तराखंड टनेल दुर्घटना घडल्याचे पहायला मिळाल्या नाहीत अशी  पुष्टी ही त्यांनी जोडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.