Ram Shinde : सुप्रिया सुळेंना दुसरा ‘वायनाड’ शोधावा लागेल – राम शिंदे

एमपीसी न्यूज : आम्ही अमेठीला गेलो तिथे जिंकलो. आता बारामतीत जिंकायची आहे. जर आम्ही अमेठी जिंकतो तर बारामतीही जिंकू. तेव्हा सुप्रिया सुळे यांना आता दुसरा मतदार संघ म्हणजेच ‘वायनाड’ पाहावा लागेल, असे भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुढील काही दिवसात बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची आखणी करण्यासाठी आमदार राम शिंदे (Ram Shinde) बारामतीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केले.

आजपर्यंत बारामती लोकसभेवर विजय मिळवण्यात भाजपला अपयश आले आहे. आगामी म्हणजेच 2024 मध्ये काहीही करून भाजपचा झेंडा फडकवायचाच या तयारीने भाजप कामाला लागली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेते, आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या महिन्यात या मतदारसंघाच अनेक भाजप नेत्यांचे दौरे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी राम शिंदे सक्रिय झाले आहेत.

Cyrus Mistry : गाडीच्या वेगाबाबत विचार करण्याची वेळ आली आहे – शरद पवार

दरम्यान यावेळी (Ram Shinde) बोलत असताना राम शिंदे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही 2014 आणि 2019 ची निवडणूक हरलो. आता आमचे लक्ष 2024 च्या निवडणुकीवर आहे. आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर मग बारामतीही आम्ही जिंकू. आम्हाला अमेठीत जावे वाटले. आम्ही तेथे गेलो आणि जिंकलो. बारामतीत 2014 ची निवडणूक हरलो, 2019 ची निवडणूकही हरलो. मात्र आता 2024 ची निवडणूक जिंकणारच. तेव्हा आता आता सुप्रिया सुळे यांना दुसरा वायनाड पहावा लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.