Pimpri: स्वामी समर्थ इंडस्ट्रीजतर्फे पोलिसांना मोफत पेपर कप आणि डिश

एमपीसी न्यूज – स्वामी समर्थ इंडस्ट्रीज (डिस्पो किंग) व एस. के. इंडस्ट्रीजतर्फे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पाणी व चहासाठी मोफत पेपर कप तसेच जेवणासाठी पेपर प्लेट व द्रोणची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मोफत पेपर कप, पेपर प्लेट व द्रोण हे देण्यात येणार आहेत. तसेच काही गरजू नागरिकांना काही कप्स किंवा पेपर प्लेट लागल्यास 7057295367/ 9921389459 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पेपर प्लेट चा व पेपर कपचा वापर हा जास्त करून दवाखान्यामध्ये होत असतो. त्याच्यामुळे जंतू पसरत नाही व ते डिस्पोजेबल आहे. कुठलेही प्रदूषण होत नाही. पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना व तसेच मावळातील नागरिकांना काही पेपर कप्स व डिश लागल्यास संपर्क करावा, असे स्वामी समर्थ इंडस्ट्रीजच्या पत्रकात म्हटले आहे.

स्वामी समर्थ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा प्रदीप नाईक, स्मिता आदित्य रानभरे तसेच त्यांचे भागीदार एस. के. इंडस्ट्रीजचे मालक स्वातीताई सुधीर शेवाळे व मारुती चव्हाण असे आम्ही सर्वजण कोरोनाच्या संकटाशी लढण्याकरिता तयार आहोत आपली साथ आम्हाला हवी आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.