_MPC_DIR_MPU_III

Nigdi : सावरकर मंडळाच्या संस्कार वर्गाला उत्साहात सुरुवात

एमपीसी न्यूज- निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने पिंपरी बुद्रुक (ता.खेड, जि.पुणे) येथे ‘हुतात्मा राजगुरू संस्कार वर्गा’ला सुरुवात करण्यात आली आहे. पूर्णपणे मोफत असणाऱ्या या संस्कारवर्गामध्ये मुलांना व्यक्तिमत्व विकास, इतिहास, संस्कृती, खेळातून शिक्षण दिले जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

अपर्णा भुजबळ, पल्लवी ठाकूर या वर्गाचे संचालन करणार असून मुक्ता चैतन्य आणि माधूरी मापारी यांचे मार्गदर्शन असणार आहे. उदघाटनासाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकूसाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

माधुरी मापारी म्हणाल्या, “आजच्या विभक्त कुटुंब पध्दतीमुळे संस्कार केंद्राची गरज निर्माण झाली असून मुलांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी हे केंद्र प्रयत्न करील”

_MPC_DIR_MPU_II

मुक्ता चैतन्य म्हणाल्या, “या संस्कार वर्गातून मुलांची जडण घडण होऊन व्यक्तीमत्व विकसित होणार आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळणार आहे” यासाठी संस्कार वर्गाची दैनंदिन कार्यपद्धती त्यांनी सांगितली.

यावेळी शारदा रिकामे यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे ताण तणाव निर्माण होत आहेत. यासाठी दिवसातील ठराविक वेळ हा व्यायाम, योगासने व प्राणायाम यासाठी राखून ठेवला पाहिजे”.

यावेळी सावरकर मंडळाच्या वतीने संस्कार वर्गासाठी चित्रकलेचे साहित्य व विविध प्रकारचे खेळ संचालिकांकडे सुपूर्द करण्यात आले. पहिल्याच दिवशी पंचवीस पेक्षा जास्त मुलांची नावनोंदणी झाली आहे. साधारणतः दोन तीन किलोमीटर अंतरावरील वाडी-वस्त्यांमध्ये राहणारी ही मुले रोज वर्गात येणार आहेत. विवेक भुजबळ यांनी स्वागत केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.