Chinchwad Crime News : तलवार नाचवत तडीपार आरोपीची दहशत, म्हणे ‘मी भाई आहे इथला’

एमपीसी न्यूज – हातात तलवार नाचवत, शिवीगाळ करत दहशत निर्माण करणा-या तडीपार आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पागेची तालिम, चिंचवडगाव याठिकाणी शुक्रवारी (दि.10) साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

विकी अनिल घोलप (वय 24, रा. पागेची तालिम, चिंचवडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस शिपाई शुभम तानाजी कदम यांनी शुक्रवारी (दि.10) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी विकी घोलप याला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. आरोपीने तडीपार आदेशाचा भंग करत हातात तलवार घेऊन हवेत नाचवत दहशत निर्माण केली. तसेच, ‘मी भाई आहे इथला’ असे म्हणत शिवीगाळ केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू केला.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.