Talavade : वेल्डींग करत असताना रंगाच्या डब्यात ठिणगी पडल्याने कंपनीला आग

एमपीसी न्यूज – वेल्डींग करीत असताना रंगाच्या ( Talavade) डब्यात ठिणगी पडल्याने कंपनीला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी तळवडे येथे घडली.

अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 12.35 वाजताच्या सुमारास मनोज नखाते यांनी तळवडे येथील रॉयल ग्रुप कंपनीत आग लागल्याची माहिती दिली.

Sangvi : गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना सहायक फौजदार रंगेहाथ सापडला

त्यानुसार तळवडे, मोशी आणि पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी फोमच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.

गणेशनगर, तळवडे रॉयल ग्रुप कंपनीमध्ये रॉड तयार करण्याचे काम केले जाते. या कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना वेल्डिगची ठिणगी रंगाच्या डब्यात पडून आगीचा भडका उडाला.

त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर धाव घेतल्याने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली ( Talavade) नाही.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.