Pimpri : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये निवड चाचणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने 66 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढत आयोजित करण्यात (Pimpri) आली आहे. या कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने सोमवारी (दि.23) कावेरीनगर क्रीडा संकुल, वाकड येथे पिंपरी चिंचवड निवड चाचणी कुस्ती स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ माती व गादी विभागाची स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे व सरचिटणीस संतोष माचूत्रे यांनी दिली.

Talavade : वेल्डींग करत असताना रंगाच्या डब्यात ठिणगी पडल्याने कंपनीला आग

कुस्तीगीरांची वजने स्पर्धेच्या दिवशी सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत क्रीडा संकुलात घेण्यात येतील. वजने झाल्यावर लगेचच कुस्ती स्पर्धेला सुरुवात होईल.

पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकारी व सभासद तसेच शहरातील कुस्तीगीर, कुस्ती शौकीन, वस्ताद‌, मार्गदर्शक मंडळी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी केले आहे.

वरिष्ठ माती व गादी विभाग – 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो व महाराष्ट्र केसरी किताब लढत साठी 86 ते 125 किलो वजन गट आहेत. कुस्तीगिरांनी अधिक माहितीसाठी सरचिटणीस पै. संतोष माचुत्रे 9822049488 यांच्याशी संपर्क (Pimpri) साधावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.