23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Talavade Crime News : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 9 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तळवडे येथे त्रिवेणीनगर – तळवडे रोडवरील अंबे स्वीट समोर सार्वजनिक रस्त्यावर झाला.

प्रभाकर लक्ष्‍मण जाधव (वय 61) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी मंगल प्रभाकर जाधव (वय 51, रा. जाधववाडी, चिखली) यांनी सोमवारी (दि. 9) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार चाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती प्रभाकर जाधव हे त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन भरधाव वेगात चालवून प्रभाकर जाधव यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने प्रभाकर जाधव यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news