Bhosari Crime News : पहाटेपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्या प्रकरणी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून हॉटेल चालू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे करण्यात आली.

शेरसिंग लक्ष्मणराम रेबारी देवासी (वय 34, रा. गवळीनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी सुरेश दत्तात्रय तांबेकर यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने नाशिक-पुणे महामार्गा लगत असलेले दोस्ती हॉटेल व्हेज नॉनव्हेज हे हॉटेल नियमांकडे दुर्लक्ष करून सुरू ठेवले. फिर्यादी हे भोसरी मार्शल कर्तव्यावर असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. त्यानुसार शासकीय आदेशाचा भंग केला म्हणून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून समज पत्र देण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.