Talavade : तळवडे आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊ

उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू सात जखमींवर उपचार सुरु

एमपीसी न्यूज – तळवडे येथे झालेल्या आग दुर्घटनेत जखमी झालेल्या(Talavade )कामगार महिलांपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान रविवारी (दि. 10) मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी (शुक्रवारी) सहा कामगार महिला दगावल्या. त्यानंतर शनिवारी दोन तर रविवारी एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

ज्योतिबा नगर, तळवडे येथे प्लॉट नंबर 252 मध्ये केकवर (Talavade )लावल्या जाणाऱ्या स्पार्कल्स बनवणाऱ्या कारखान्यात शुक्रवारी (दि. 8) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर दहाजण जखमी झाले. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

Talavade : तळवडे आग दुर्घटना; जखमी रुग्ण आणि नातेवाईकांच्या सर्वतोपरी मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मदत कक्ष

संगीता देवेंद्र आबदार (वय 28), पुनम अभय मिश्रा (वय 36), लता भारत दंगेकर (वय 40), मंगल बाबासाहेब खरबडे (वय 45), राधा सयाजी गोधडे (वय 18), कमलादेवी सुरज प्रजापती (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा अशोक तोरणे (वय 16), कविता गणेश राठोड (वय 40) यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शिल्पा गणेश राठोड (वय 31) या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

अपेक्षा तोरणे (वय 26), रेणुका ताथोड, (वय 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), राधा उर्फ सुमन यादव (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (वय 32) या सात जणांची मृत्यूची झुंज सुरु आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.