Talawade : रुपीनगर येथे गॅलरीच्या खिडकीतून प्रवेश करत सव्वा लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराच्या गॅलरीच्या खिडकीतून (Talawade) प्रवेश करत चोराने घरातील दागिने व  रोख रक्कम असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हि घटना तळवडे येथील रुपीनगर परिसरातील घरीद्वारका सोसायटी येथे गुरुवार (दि.4) ते शुक्रवार (दि.5) या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी महेश चंद्रकांत जवळगी (वय 38 रा.रुपीनगर) यांनी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri :देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी – गिरीश प्रभुणे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या गॅलरीच्या खिडकीतून चोराने प्रवेश केला. त्याने घराच्या बेडरुममधील फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातून 72 हजार 500 रुपये व टेबलवर ठेवलेल्या 15 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या  असा एकूण 1 लाख 22 हजार 500 रुपयांचा ऐवज चोराने चोरून नेला आहे. यावरून चिखली पोलीस पुढील तपास (Talawade) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.