Talegaon : जैन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शिका चतुरबाई रायसोनी यांचे निधन

एमपीसी न्यूज – कामशेत येथील जैन समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शिका चतुरबाई सुरजमल रायसोनी यांचे आज (मंगळवारी) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

चतुरबाई रायसोनी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. मृत्यूपश्चात त्यांची देहदानाची इच्छा होती. त्यानुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सुन, नातसून, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. कामशेत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष रायसोनी यांच्या त्या  मातोश्री तर उद्योजक सचिन रायसोनी आणि विपुल रायसोनी यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.