Talegaon Crime News : अवैध दारू विक्री, सामजिक सुरक्षा विभागाचे दोन ठिकाणी छापे ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अवैध दारूची वाहतूक आणि विक्री चालणाऱ्या दोन ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाने छापे टाकून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही ठिकाणावरुन चार जणांना ताब्यात घेतले आहे. चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात बुधवारी (दि.23) हि कारवाई करण्यात आली.

चाकण परिसरात पुणे-नाशिक रोडलगत नाणेकरवाडी येथे गणेश चायनीज आणि बिर्याणी हाऊस या सेंटरवर बुधवारी (दि.23) दुपारी सव्वा चार वाजता छापा टाकला. याठिकाणी आरोपी केशव रामचंद्र शिनगारे (वय 38, रा अहमदनगर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 44 हजार 790 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटक आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

चाकण तळेगाव रोडवर केलेल्या कारवाईत आरोपी राजकुमार विलास शर्मा (वय 22, रा माणिक चौक, चाकण, मुळगाव उत्तर प्रदेश), सनी कुमार राम जंग यादव (वय 21, रा. चिंचवड, मुळगाव उत्तर प्रदेश) हे दोघे पिकअप (एमएच 14 डीएम 5863) मधून देशी विदेशी दारू व बियरच्या बाटल्यांची वाहतूक केली. पुढे हि दारू हॉटेल मालक कुमार महादेव लांडगे (वय 27, रा. इंदुरी, मावळ, मुळगाव माढा) यांनी त्याची विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळून 4 लाख 69 हजार 882 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.