Talegaon Crime News : मैत्रीच्या बहाण्याने विश्वास संपादन करून महिलेवर बलात्कार; तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मैत्री करण्याच्या बहाण्याने एका महिलेचा विश्वास संपादन करून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणास सांगितल्यास तिची बदनामी करून तिच्या लहान भावाला ठार मारणार असल्याची धमकी दिली.

याबाबत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2017 ते सन 2019 या कालावधीत आंबी येथील समाधान लॉज आणि दादर मुंबई येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

रमेश दत्तू शिंदे (वय 26, रा. कुसवली, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला निव्वळ मैत्री करतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. तिला फसवून वेळोवेळी आंबी येथील समाधान लॉजवर तसेच दादर मुंबई येथे आरोपीच्या मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास महिलेची बदनामी करण्याची तसेच तिच्या लहान भावाला ठार मारण्याची धमकी आरोपीने दिली.

फिर्यादीचे जमलेले लग्न मोडून तिची समाजात बदनामी केली. याबाबत फिर्यादी महिलेने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.