Pune Crime News : ‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीला ब्ल्यू फिल्म दाखवत त्याप्रमाणेच करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकल्याप्रकरणी पती आणि सासू-सासरे आणि ननंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा ऑक्टोबर 2020 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून त्यांनी डिसेंबर 2020 मध्ये घर सोडले होते. पती वारंवार ब्ल्यू फिल्म दाखवून त्याप्रमाणे करण्याची मागणी पत्नीकडे करत होता. इतकेच नाही तर त्याने जबरदस्ती करत तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले होते. पत्नीने असे करण्यास नकार दिला असता आत्महत्या करण्याची धमकी देत होता. असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

“ब्ल्यु फिल्म’ दखवत पत्नीला तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पतीने छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसे न केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. या सर्वाला सासू सासऱ्याचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान पतीवर मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार सुरू होते. ही माहिती सासू सासऱ्यांनी आपल्यापासून लपवली असल्याचेही फिर्यादी यांनी म्हटले आहे. आपली फसवणूक केली असल्याचे सांगत फिर्यादी यांनी तक्रार दिली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.