Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थातर्फे विविध कार्यंक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था तर्फे भव्य हळदीकुंकू आणि तिळगुळ समारंभ तसेच ‘खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम’ चावडी चौक तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमास २००० महिलांनी सहभाग नॊदवीला. यावेळी अमित शिवले आणि सहकारी श्री क्षेत्र देहू यांचा “खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम” आणि “लकी ड्रॉ” संस्थेकडून आयोजित केला होता.

पैठणीच्या खेळात प्रथम क्रमांक मिळावीत मनीषा दिवाण यांना मानाची पैठणी आणि स्मार्ट फोन तसेच दुसरा क्रमांक गौरी निगडकर यांना मानाची पैठणी तसेच नथ तिसरा क्रमांक उमा भोसले यांना पैठणी आणि टेबल फॅन अशी बक्षीसे मिळवली. संस्थे मार्फत कार्यक्रम दरम्यान अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

  • लकी ड्रॉमध्ये लहान मुलांकडून प्रवेशिकेच्या चिठ्ठया उचलून पुढीलप्रमाणे : बक्षिसे वितरित करण्यात आली. एक एलसीडीटीव्ही¸ शिलाई मशीन¸ ड्रेसिंग टेबल¸ इंडकशन शेगडी¸ टेबल फॅन¸ ज्युसर अशी विविध बक्षिसे महिलांना मिळाली.

कार्यक्रमासश्री आनंद भेगडे संतोष भेगडे¸शरद भोंगाडे¸सतीश भेगडे¸ राहुल पारगे¸ निलेश राक्षे¸श्वेता भोंगाडे नूतन भेगडे¸ अनिता भेगडे¸ उर्मिला भेगडे, मनीषा पारगे, शीतल भेगडे, मेधा भेगडे, अनिता सु. भेगडे, वैशाली भेगडे, राधाबाई भेगडे, मोनाली भेगडे तसेच संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पारगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.