Talegaon Dabhade : खासदार निधीतून पवना शाळेच्या रस्त्यासाठी ३ लाख निधी मंजूर

खासदार श्रीरंग बारणे आणि संतोष खांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न

एमपीसी न्यूज – आज पवना विद्या मंदिर, पवनानगर येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून पवनानगर मुख्य रस्ता ते पवना विद्या मंदिर शाळेसाठी काँक्रटीकरण रस्त्यासाठी ३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला. 

या रस्त्याचे भूमीपूजन खासदार श्रीरंग बारणे आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोषजी खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II
  • यावेळी समर्थ विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा, रिपाइं (आर.पी.आय.) मावळचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, शाळेच्या प्राचार्या प्रिती जंगले, पर्यवेक्षिका निला केसकर, ज्येष्ठ अध्यापक पांडुरंग ठाकर, शिवसेनेचे नेते अमित कुंभार, शांताराम भोते, अनिल भालेराव, प्रकाश कदम, किशोर शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीरंग बारणे यांना पाचवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने संतोषजी खांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.