_MPC_DIR_MPU_III

Bhosari : भाजपची ‘विजय संकल्प बाईक रॅली’ उत्साहात

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बाईक रॅली उत्साहात पार पडली. ही बाईक रॅली आज (रविवारी) सकाळी दहा वाजता सुरु झाली. सुमारे 52 किलोमीटर अंतर परिसरातून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_IV

विजय संकल्प बाईक रॅलीमध्ये खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विलास मडिगेरी, भीमा फुगे, निर्मल गायकवाड, संतोष मोरे, दिनेश यादव, सागर हिंगणे, अश्विनी जाधव, योगिता नागरगोजे, राजेंद्र लांडगे, लक्ष्मण सस्ते, सागर गवळी, नम्रता लोंढे, पांडुरंग भालेकर, गोपी आप्पा धावडे, विकास डोळस, नितीन लांडगे, खासदार अमर साबळे यांच्या बाईकचे सारथ्य महापौर राहुल जाधव यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II
  • रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. भोसरी येथील पीएमटी चौक ते दिघी रोड, दिघी, आळंदी रोड, साई मंदिर, च-होली गाव, च-होली फाटा, आळंदी फाटा, डुडुळगाव, मोशी, चिखली रोड, चिखली, तळवडे, निगडी मार्गे भोसरी या मार्गावरून रॅली काढण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संपर्क अभियान राबविण्यात येत आहेत. त्यातील ‘विजय संकल्प बाईक रॅली’ हे एक अभियान आहे. या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून येणा-या लोकसभा निवडणुकांसाठी सक्रिय करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.