Talegaon Dabhade : ॲड्. पु वा परांजपे विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – ॲड्. पु. वा. परांजपे विद्यामंदिरात 75वा प्रजासत्ताक दिन (Talegaon Dabhade ) उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये रांगोळी, तिरंगी फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन व संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सल्लागार माजी मुख्याध्यापक,माजी विद्यार्थी गणपतराव काळोखे गुरुजी,शालेय समितीचे सदस्य, अशोक काळोखे,शाळेचे माजी विद्यार्थी तुषार भेगडे,संजय बावीसकर,श्रीकांत दाभाडे,चंद्रकांत थिटे,सचिन भेगडे,ऋषिकेश कुलकर्णी,पल्लवी कोंडेकर,सुचित्रा कुलकर्णी,शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,पर्यवेक्षिका कमल ढमढेरे, माजी विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणपतराव काळोखे गुरुजी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यानी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत म्हटले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेतील जेष्ठ अध्यापक विकास दगडे सर यांनी केले.

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश; मुंबईत पोहचण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य

मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सरांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या विकासाचा चढता आलेख तसेच विद्यार्थ्यांना (Talegaon Dabhade ) प्रजासत्ताक दिन व संविधानाचे महत्त्व पटवून दिले. मान्यवरांचा सत्कार पांडुरंग पोटे यांच्या हस्ते शाल,रोप,गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थी संजय बावीसकर,श्रीकांत दाभाडे,ऋषिकेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून भारताला बलशाली बनविण्यासाठी कठोर व एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे सदस्य अशोक काळोखे यांनी भारताच्या उज्वल भविष्यासाठी आपण आदर्श नागरिक होणे महत्त्वाचे आहे असा संदेश आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना देऊन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.शाळेच्या पर्यवेक्षिका * कमल ढमढेरे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशा आवटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.