Talegaon Dabhade : मावळच्या गतिमान विकासासाठी संधी मिळेल – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मावळ मतदारांमध्ये खूप मोठा आत्मविश्वास आहे आणि प्रचार दौऱ्यात तो दिसून येत होता. आता, सलग तीन वेळा जनतेच्या आशीर्वादाने भाजपचा कार्यकर्ता नक्कीच निवडून येईल, असा विश्वास मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

आज सकाळी बरोबर 7 वाजता बाळा भेगडे यांनी तळेगाव दाभाडे येथे भेगडे आळी या ठिकाणी कैकाडी समाज मंदिर या मतदान केंद्रावर पत्नी सारिका भेगडे यांच्या समवेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते बोलत होते.

बाळा भेगडे म्हणाले, “ही निवडणूक माझ्यासाठी आव्हानात्मक नव्हती तर पुढील कामे अधिक जोमाने करण्याची आहे. मावळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी दिवस रात्र कष्ट घेऊन निष्ठापूर्वक त्याग केल्याने भाजप उमेदवार याठिकाणी विजयी होत आहे”

पावसाची शक्यता लक्षात घेता मतदारांनी अधिकाअधिक मतदान लवकर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.