Talegaon Dabhade : अपघातग्रस्तांसाठी देवदूत बना – डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. वेळेवर उपचार न मिळाल्याने जखमी व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका असतो. आपल्यासमोर अपघात झाला असेल तर पाहत न बसता अपघातग्रस्त व्यक्तीला देवदूत बनून मदत करावी. रुग्णवाहिका, पोलिसांना याबाबत माहिती द्यायला हवी. तसेच अपघात होऊ नये म्हणून प्रत्येकाने वाहतुकीची शिस्त पाळायला हवी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित, इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रस्ता सुरक्षा वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार (दि 17)  रोजी रस्ता सुरक्षा अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डाॅ मलघे बोलत होते. याप्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, विशाल गजरमल पीएसआय तसेच जीवननिर्माण संस्थेचे डॉ. वेदव्यास मोरे , दत्ता पंडगे, डॉ. किरण राजपूत, संदीप कदम राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.राजेंद्र आठवले, सोनम गवांडे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अगदीच आवश्यकता असेल तरच प्रवासासाठी वाहन वापरावे तसेच नियमाचे पालन करावे. अपघात प्रसंगी आपण देवदूत बनून अपघातग्रस्तांना पुढे येऊन मदत करावी. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असून सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे असे आव्हान त्यांनी यानिमित्ताने केले. याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी राजेंद्र  आठवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रसाद गोकुळे तसेच विशाल गजरमल यांनी वाहतुकीचे नियम उपस्थितांना सांगितले. महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी रीतसर वाहन चालवण्याचा परवाना घ्यावा. तसेच ट्रिपल सीट वाहन चालू नये. जर आपल्या हातून चुकून अपघात झाला व गुन्हा दाखल झाला तर भविष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात .त्यामुळे नियमाचे पालन करावे.

दिवसभरामध्ये चाललेल्या या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांना रस्ता सुरक्षा  संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. रस्ता अपघातामध्ये अपघातग्रस्ताला त्वरित दवाखान्यामध्ये पोचवणे आवश्‍यक असते. त्यासाठी अंबुलन्सची गरज भासते 108 नंबर अपघातप्रसंगी त्वरित सदर अंबुलन्स वर फोन केल्यानंतर त्वरित ॲम्बुलन्स उपलब्ध होते. आणि  त्यामध्ये असलेल्या सोयी सुविधा तसेच अपघातग्रस्ताला रेस्क्यू कसं करायचं यासंबंधी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अंबुलन्स दाखवून त्याबाबतची माहिती दिली.
डॉ. मोरे यांनी याप्रसंगी प्रशिक्षणार्थींना सांगितले की,जीवनदूत म्हणून आपल्याला काम करायचे आहे. आपण अपघातग्रस्ताला मदत करायची आहे .कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता आपल्याला सदर व्यक्तीचा जीव वाचवायचा आहे. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि अपघातग्रस्ताला मदत करत असताना आपली स्वतःची काळजी देखील घ्यावी असे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=F4t2TM2LO7k
निर्माण संस्था,पुणे यांच्या वतीने स्वयंसेवकांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. दत्ता पंडगे यांनी माहिती दिली.
 कार्यशाळेचा समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा सोनम गवांडे यांनी मानले. याप्रसंगी प्रसाद गोकुळ यांनी  संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या पुढाकाराने संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षण व उद्बोधन कार्यक्रम घेण्याची संधी मिळत आहे तसेच मावळ तालुक्यात शिक्षण देणारी ही एक अग्रगण्य संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.