Maval News : दुर्गम भागातील उधेवाडी, राजमाची गावातील 150 नागरिकांची मोफत नेत्रतपासणी; रोटरी करणार 10 लोकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब आॕफ तळेगाव एमआयडीसी व पार्वती नेञालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उधेवाडी आणि राजमाची गावात मोफत नेत्रतपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 150 नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यातील 10 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागणार असून याचा संपूर्ण खर्च रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी करणार आहे.
 रविवार (दि.13)फेब्रुवारी  रोजी मावळ तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील उधेवाडी, राजमाची गावात रोटरी क्लब MIDC व पार्वती नेञालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे मोफत नेञतपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये गावातील 150 लोकांची नेञतपासणी पार्वती नेञालयाचे नेञतज्ञ रो.डाॕ.अशोक दाते व त्यांच्या टीमने केली.यामध्ये 10 लोकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे .त्या दहा लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करून देण्याचे आश्वासन रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC चे संस्थापक अध्यक्ष  रो. संतोष खांडगे  यांनी दिले. बाकीच्या किरकोळ नेञआजार असणाऱ्या लोकांना मोफत चष्मे व औषध वाटप करण्यात आले. या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन रो.विल्सन सालेर,व रो.सचिन कोळवणकर होते.

यावेळी रोटरी MIDC चे संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे,अध्यक्षा रो. सुमती निलवे,सेक्रेटरी रो.प्रविण भोसले सर्व बोर्ड आॕफ डायरेक्टर्स,मेंबर्स व सांगाती सह्याद्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक रो.सुमती निलवे यांनी तर आभार रो.लक्ष्मण मकर सर यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.