Chakan News: शिवजयंती निमित्त पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शन

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पसमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रतिमा पूजन, शिव पालखीची मिरवणूक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिवकाळ समजावा, राष्ट्रहिताची भावना त्यांच्यात रुजावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याचे पी के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी सांगितले.

शिवरायांनी ज्या साहित्याद्वारे युद्धे लढली ते साहित्य विद्यार्थ्यांना पाहता यावे व त्यामधून विद्यार्थ्यांच्या वाचनात शिवरायांचा इतिहास यावा यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिवचरित्र वाचावे,देशप्रेम जागृत व्हावे, मन,मनगट आणि मेंदू केवळ आणि केवळ मातृभूमीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरले जावे. या दृष्टीकोनातून या प्रदर्शनाचे आयोजन शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच,चिंचवड यांच्या मदतीने करण्यात आलेले आहे. सदर प्रदर्शन हे सर्वांसाठी खुले असून आपणास सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेमध्ये पाहता येईल.

शिवजयंतीच्या निमित्ताने पी के टेक्निकल कॅम्पस मध्ये उद्या सकाळी साडे नऊ पासून शिवप्रतिमा पूजन, शिव पालखीची मिरवणूक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व शिवकालीन युद्ध साहित्य प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल. सदर शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पी के फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.