Talegaon Dabhade : शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरातील तुटलेले(Talegaon Dabhade )चेंबर,भुयारी गटार, आठवडे बाजारातील समस्या, पार्किंगच्या समस्या अशी सर्व प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष अशोक दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे (Talegaon Dabhade )सरचिटणीस शोभा भेगडे,स्वप्निल भेगडे,तनुजा दाभाडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा परदेशी,गजानन राजहंस,ॠषीकेश सुतार,अमरीश कुमार,विनोद उपाध्याय,सुधाकर घनशेट्टी,अरुण भेगडे,सुनिता पाटील आदी उपस्थित होते.

यामध्ये अनेक ठिकाणी चेंबर फुटल्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावर येत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सदर चेंबर दुरूस्तीचे काम लवकर पुर्ण करावे.तसेच रस्ते आणि भुयारी गटारी संदर्भातील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी.
त्याचप्रमाणे दर रविवारी भरणारा आठवडे बाजार हा नेमुन दिलेल्या ठिकाणीच भरविण्यात यावा आणि गाड्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. ही सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यात यावी असे निवेदन तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील  यांना देण्यात आले आहे.
मुख्याधिकारी एन के पाटील यांनी सर्व प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करू असे मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.