Talegaon Dabhade : नगरपरिषद कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये आद्य(Talegaon Dabhade )पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याधिकारी एन. के. पाटील आणि तळेगाव दाभाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांच्या हस्ते जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार संघाचे गणेश बोरुडे,प्रभाकर तुमकर,राजेश बारणे, छायाचित्रकार श्रीकांत चेपे तसेच माजी नगर सदस्य सचिन टकले आणि नगर परिषदेच्या कर निरीक्षक विजय शहाणे,भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन,महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सुवर्णा काळे, संगणक विभाग प्रमुख सोनाली सासवडे, रोहित भोसले,करसंकलन लिपिक प्रवीण माने,विलास वाघमारे,आदेश गरुड,प्रवीण शिंदे, विशाल लोणारे, आशिष दर्शले, उषा बेल्हेकर, प्रफुल्ल गलीयत,सनी ननावरे,नाईक अनिल इंगळे, चंद्रशेखर खंते आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Chakan: खेड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार

यावेळी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांनी समाजाचे विषय सकारात्मकरित्या मांडावे असे आवाहन केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवन,शिक्षण आणि त्यांचे पत्रकारितेतील योगदान याची माहिती विशद केली.
 यावेळी माजी नगरसेवक सचिन टकले,पत्रकार राजेश बारणे आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आस्थापना लिपिक भास्कर वाघमारे यांनी केले तर आभार कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.