Charholi khurd: शिवयंती निमित्त चऱ्होली खुर्द मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज –शिवजयंती महोत्सवा निमित्ताने च-होली खुर्द येथे दि.12 फेब्रुवारी  ते 19 फेब्रुवारी (Chaholi khurd)या कालावधी मध्ये  रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते.

 

तसेच काल दि.19 रोजी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chaholi khurd)पूजन व मिरवणूक ,चऱ्होली खुर्द जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम ,शिवव्याखान,विचारमंथन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन राहुल थोरवे व सतीश थोरवे यांनी केले होते.

Pune: इंद्रायणी प्रदूषणाने नागरिकांचा रोष ; तातडीच्या उपाययोजनांची गरज

या विविध कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थ च-होली खुर्द ,श्री रोकडोबा सर्व्हिसेस,जय संतोषी फ्लोरिस्ट अँड टुटॉन्स इव्हेंट मॅनेजमेंट यांचे सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी च-होली खुर्द कमिटी,वारकरी सांप्रदायिक पारमार्थिक सेवा क्षेत्रा साठी जय हनुमान सेवा ट्रस्ट,सामाजिक व राजकीय क्षेत्र प्रकाश थोरवे,उद्योजक हर्षल पगडे,धार्मिक  सांप्रदायिक सेवा क्षेत्र संजय थोरवे ,आळंदी-च-होली येथे शासनाने तर्फे आपले कर्तव्य सेवा बजवणाऱ्या  क्षेत्रातील मान्यवरांना, पत्रकार बांधवांना तसेच राजकीय, सामाजिक,धार्मिक,क्रीडा अश्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना च-होली खुर्द विशेष पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले.

 

च-होली खुर्द ची हीरकणी कोण ?खेळ रंगला पैठणीचा या खेळाचे आयोजन करून विविध मोठी बक्षिसे वाटप करण्यात आली.यावेळी चऱ्होली ग्रामपंचायत, जि.प. शिक्षकवृंद व ग्रामस्थ मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.