Pune : सायबर सुरक्षेसाठी सजगता महत्वाची – डॉ. दीप्ती लेले

एमपीसी न्यूज – समाजमाध्यमांचा व इंटरनेटचा (Pune)वापर करताना सायबर सुरक्षाविषयक सजगता अधिक महत्वाची आहे, असे मत सायबर तज्ज्ञ डॉ. दीप्ती लेले यांनी व्यक्त केले.

यशस्वी संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या सायबर(Pune) सुरक्षा जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ईमेल, व्हॉट्स अप, फेसबुक आदींचा वापर सावधानपणेच करायला हवा. अनोळखी संदेशाला प्रतिक्रिया देणे टाळावे, कोणत्याही अमिषाला बळी पडू नये.

Pune: पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड कोंडी

विशेषतः आपली गोपनीय माहिती, बँक खात्याची माहिती अथवा महत्वपूर्ण माहिती कधीही योग्य खातरजमा केल्याशिवाय कोणालाही देऊ नका, असे सांगत ऑनलाईन गेम्स, ऑनलाईन शॉपिंगच्या संकेतस्थळावरून अनेकांना मोठे आर्थिक नुकसान झाल्याची उदाहरणे सांगत त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच दर आठवड्याला डेटाचा बॅक अप आवश्य घेऊन ठेवावा. अधिकृत सॉफ्टवेअरचाच वापर करावा. आपली व्यक्तिगत माहिती, कुटुंबातील सदस्यांचे फोटो उगीचच समाजमाध्यमांवर अपलोड करू नये, याच माहितीचा आधार घेऊन गुन्हेगार गुन्हे करतात हे लक्षात घ्यावे, केंद्र सरकारने जारी केलेल्या सायबर सुरक्षेविषयक संकेतस्थळांची माहितीही त्यांनी दिली. सायबर गुन्हेविषयक तक्रारींसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन १९३० ला संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले. या ऑनलाईन कार्यशाळेत ‘यशस्वी संस्थेतील वरिष्ठ पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.