Chakan: खेड तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार

 एमपीसी न्यूज –  महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक (Chakan)उदाहरणे खेड तालुक्यात समोर येत आहेत. शेकडो घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिल देयके येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

 

त्यातच महावितरणचे अधिकारी ठेकेदारांच्या तालावर नाचत (Chakan)अनेक उपद्व्याप करत असल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण भागात महावितरणचा तुघलकी कारभार, शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. ग्रामीण भागात खंडित होणारा वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी अर्थपूर्ण तडजोडी करून एक्प्रेस फिडर मधून काही बड्या मंडळीना वीज जोडण्या परस्पर दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. अनेक मोक्याच्या ठिकाणी भ्रष्ट अधिकारी पदावर असल्याने सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार होत असल्याच्या असंख्य तक्रारी समोर येत आहेत.  वीज बिले न भरल्यास कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र वीज बिले वेळत ग्राहकांना मिळतील याची दक्षता घेतली जात नाही.

 

Pune : जिल्ह्यातील नागरिकांना ‘शिवगर्जना’ महानाट्य पाहण्याची संधी

अनेक महिन्यांपासून वीज बिले मिळत नसल्याने ग्राहक वीज कर्मचाऱ्यांना विचारणा करीत आहेत, तर वीज वितरण अधिकारी व कर्मचारी ‘वीज बिले तुम्ही काढा व तुम्ही भरा’… असा उलटा सल्ला दिला आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानीविरोधात ग्राहक संतप्त झाले आहेत. महावितरणच्या काही अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार थेट पोलिसांत गुन्हे दाखल होऊन चव्हाट्यावर येत असताना देखील त्यांच्या कार्यशैलीत काहीही बदल होत नसल्याचा सामान्य वीज ग्राहकांचा आरोप आहे.

गुन्हे दाखल; तरीही मनमानी सुरूच
महावितरणच्या मीटरचा लाखो रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर अपहार करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी चाकण येथील वीज मंडळाच्या उपकार्यकारी अभियंत्यासह एका खाजगी कंपनीचा मालक अशा एकूण चौघांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तसेच महावितरण कंपनीला न कळवता परस्पर वीज वाहिन्यांना केबल जोडून दोन ठिकाणी वीज कनेक्शन घेण्यात आल्याचा प्रकार चाकण भागात नुकताच उघडीस आला होता.  महावितरणच्याच एका ठेकेदारावर चाकण पोलिसांत काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपरोक्ष कशा होतील ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.