Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

एमपीसी न्यूज – इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल (Talegaon Dabhade) स्कूलचा इयत्ता दहावी (सीबीएसई) बोर्डाचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला. त्यामध्ये शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

Pune : डॉ. वैशाली खेडकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर निवड          

सिद्धी ढोरे 91 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. तर चांदणी खान हिने 88.44 टक्के गुण मिळवून द्वितीय व सुरज मुखिया याने 85.20 टक्के  मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. या यशामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांचा मोठा सहभाग आहे. संस्थेचे संस्थापक भगवान शेवकर, सुजाता तोलानी नाईक, कुमार सर, सकसेना सर यांनी प्राचार्य आणि शिक्षक वृंदाचे  अभिनंदन केले.

संस्थेच्या शंभर टक्के निकालाच्या परंपरेचा समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत असून अथक परिश्रमातून  ग्रामीण भागामध्ये सीबीएसई सारखी संस्था स्थापन करून गाव आणि देशासाठी  परिश्रम करणाऱ्या संस्थेचे , समाजातील मान्यवरांकडून विशेष कौतुक केले (Talegaon Dabhade) जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.