Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’पर्यटनस्थळाचा दर्जा, तर मोरया गोसावी देवस्थानाला विकास निधी

एमपीसी न्यूज – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत (Pune ) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे तर  चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.19)  झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, यांच्या सह जिल्ह्यातील आमदार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळेसाठी 4.50 कोटी, क्रीडा विकासासाठी 16 कोटी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी 3.10 कोटी राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत 41 कोटी 93 लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

या निर्णयाची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटंले आहे की, “पुणे जिल्हा नियोजन समितीची आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता दिली.

पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी डीपीसीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात येणार आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी निधी देण्याचा आणि पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी आल्यास निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पुण्यातील सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर आणि वाफगावच्या होळकर वाडा वास्तूंचं राज्य सरकारकडून संवर्धन करण्यात येणार (Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.