PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह प्रदीर्घ रजेवर; पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे अतिरिक्त पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC)आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. आयुक्तांच्या रजा कालावधीत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिला आहे. शासनाचे सह सचिव सु.मो. महाडिक यांनी आदेश काढला आहे.

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’पर्यटनस्थळाचा दर्जा, तर मोरया गोसावी देवस्थानाला विकास निधी

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अर्जित रजा मंजूर करण्यासाठी 16 मे रोजी शासनाकडे अर्ज पाठविला होता. आयुक्त सिंह हे 22 मे पासून रजेवर असणार आहेत. 30 मे पर्यंत म्हणजेच 9 दिवस रजेवर असणार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सोपविला (PCMC) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.