PCMC : शहरातील 671 जणांनी घेतला ऑनलाइन श्वान परवाना

एमपीसी न्यूज – गेल्या नऊ महिन्यात 671 श्वान मालकांनी (PCMC) श्वानासाठी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे.  परवाना न घेता श्वान पाळल्यास संबंधित श्वान मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने दिला आहे.

परवाना प्राप्त केल्याशिवाय श्वान पाळू नये, असा शासन नियम आहे. त्यानुसार पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागामार्फत श्वान मालकास श्वान परवाना दिला जातो. यामध्ये श्वान मालकास प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपूर्ण प्रक्रिया करुन घ्यावी लागते. त्यामुळे अनेक श्वान मालक अधिकृत परवाना घेत नव्हते.

Pune : डॉ. वैशाली खेडकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळावर निवड          

 

याचाच विचार करून महापालिकेने हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना 4 ऑगस्ट 2022 पासून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाइन श्वान परवाना उपलब्ध करून दिला आहे. गेल्या नऊ महिन्यात 671 नागरिकांनी श्वानासाठी ऑनलाइन अर्ज करून परवाना घेतला आहे.

PCMC : महापालिका आयुक्त शेखर सिंह प्रदीर्घ रजेवर; पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे अतिरिक्त पदभार

ऑनलाइन परवान्याची मुदत परवाना प्राप्त झाल्यापासुन एक वर्षापुरती असणार आहे. दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहील. श्वानास रेबीज लसीकरण करणे बंधनकारक असल्याचे पशू वैद्यकीय विभागाने स्पष्ट (PCMC) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.