Talegaon Dabhade : विणेकरी ह.भ.प. दत्तोबा विठोबा वाडेकर यांना वारकरी भूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज- मावळ तालुका दिंडी सोहळ्याचे विणेकरी ह.भ.प. दत्तोबा विठोबा वाडेकर यांना वारकरी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 15) ला सायंकाळी 7 वाजता विठ्ठल रखूमाई मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे.

दत्तोबा वाडेकर गेली पन्नास वर्षे वाहनगावातील विठ्ठल रखूमाई मंदिरातून वीणा घेऊन प्रत्येक एकादशीला माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला येत असत. त्यांनी काही वर्षे भंडारा डोंगरावरून त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात विणेकरी म्हणून काम केले. बारा वर्षे देहू येथून तुकोबारायांच्या पालखी समवेत ते पंढरपुरात विणेकरी म्हणून गेले आहेत. अशी माहिती राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामदास वाडेकर यांनी दिली.

यावेळी बजरंग भजनी मंडळातील आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुणीजनांचा देखील गौरव करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.