Pune : ‘जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान’ विषयावर प्रदीप वाल्हेकर यांचे व्याख्यान

एमपीसी न्यूज- जीविधा, निसर्गसेवक व देवराई फाऊंडेशनतर्फे ” जलपर्णी मुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान” विषयावर प्रदीप वाल्हेकर यांच्या व्याख्यानाचे आज, बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी साडेसहा वाजता. इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर,दत्तवाडी येथे हे व्याख्यान होईल .

प्रदीप वाल्हेकर यांनी जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे जीवनध्येय मानून अभियान सुरू केले आहे. स्वतःच्या खिशातून लाखो रुपये घालून ते पवना नदी जलपर्णी मुक्त करण्याचे काम करत आहेत. त्याच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्त्यांची फौज या कामी उभी राहिली आहे. जलपर्णी पक्व होण्याआधी काढली तरच ती परत परत येणार नाही हे या अभियानाचे सूत्र आहे. या मोहिमेची माहिती व्याख्यानातून देण्यात येणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.