Talegaon Dabhade : माजी उपसभापती स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करतात तेव्हा…

एमपीसी न्यूज – स्टोन क्रशरच्या अवजड वाहतुकीमुळे (Talegaon Dabhade) तळेगाव-निगडे रस्ता खड्डेमय झाला. स्टोन क्रशर मालकांना वारंवार सांगूनही रस्ता दुरुस्तीसाठी त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मावळ पंचायत समितीचे माजी उप सभापती शांताराम कदम आणि आबंळे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आशा संपत कदम यांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला.तक्रार करून प्रशासनाच्या उपाययोजनांसाठी वाट पाहत न बसता कदम यांनी तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे.

याप्रसंगी बंडु कदम,राम कदम,अजिंक्य कदम,प्रमिला कदम, संपत कदम, सचिन कदम, स्वामी वहिले, राजु शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

उपसभापती कदम माहिती देताना म्हणाले की,आंबळे व मंगरूळ या गावामध्ये गेली 10 वर्षापासुन सुमारे 17 ते 20 स्टोन क्रशर व वाळु वाॅश शॅन्ड 7 व डांबर प्लॅन्ट4 असे व्यवसाय चालू असून  यामुळे तळेगाव ते निगडे रस्त्यावर सुमारे 1000 ते 1200 माल वाहतूक डंपर रोज रात्रंदिवस वाहतूक करत आहेत.

त्यामुळे मंगरूळ, आबंळे, शिरे, शेटेवाडी, कदमवाडी, घोलपवाडी या गावातील सर्व नागरीकांना प्रदुषणाचा व वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक रस्ता अत्यंत खराब झालेला असून अनेक वर्षापासून क्रशर मालक व प्रशासकीय अधिकारी व प्रदुषण नियंत्रण मंडळ पुणे यानां सांगून देखील ते जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

 स्टोन क्रशर बंद करण्याचा निर्णय  

स्टोन क्रशरवरून रात्रंदिवस वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे परिसरात हवेचे प्रदूषण वाढत आहे. मंगरूळ, आबंळे, शिरे, शेटेवाडी,कदमवाडी, घोलपवाडी या गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास हा प्रकार आणून देऊन देखील अर्थपूर्ण हितसंबंधांमुळे मंडळाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे आता नागरिक आपल्या आरोग्यासाठी लढा उभारणार असून स्टोन क्रशर बंद पाडणार आहेत.

या सर्व त्रासाला कंटाळून माजी उपसभापती शांताराम (बापु) कदम व आंबळे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त (Talegaon Dabhade) महिला सरपंच आशा संपत कदम यांनी स्व खर्चातुन सुमारे दोन की.मी. रस्त्यावर खडी व मूरूम टाकुन पुर्ण करुन घेतला आहे.

डंपर वाहतुकीच्या प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत असल्याने लवकरात लवकर सर्व स्टोन क्रशर बंद करण्याचा निर्णय सर्व गावातील नागरिक एकत्र करून करणार आहेत असे सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.