Talegaon Dabhade : दहावी, बारावी नंतरच्या करिअरसाठी मार्गदर्शन संपन्न

एमपीसी न्यूज – इयत्ता दहावी, बारावी नंतर (Talegaon Dabhade) पुढे काय,या विषयावर प्रा. विजय नवले यांचे व्याख्यान संपन्न झाले. दहावी,बारावी नंतरच्या करिअरच्या दिशा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी,मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव स्टेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी अध्यक्ष विन्सेंट सालेर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्यवाह देवराम पारिठे,सुदाम दाभाडे,विलास टकले,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सोनबा गोपाळे,पांडुरग पोटे,सुनील खोल्लम,मिलिंद शेलार,शिक्षक परिषद उपाध्यक्ष श्रीनिवास गजेंद्रगडकर, सोपान असवले, सल्लागार संघटक संजय वंजारे, रो. अंतोष मालपोटे,संदिप मगर, मुख्याध्यापक शमशाद शेख,  पर्यवेक्षक रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिन्ही संस्थांचे मार्गदर्शक संतोष खांडगे यांनी केले ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे  जास्तीत जास्त लक्ष देऊन आपले करिअर घडवावे.

प्रा.विजय नवले यांनी करिअरची अनेक नवनवीन क्षेत्र निवडुन अभ्यास सातत्य ठेवुन आपल्या ध्येयापर्यंत पोहचावे.पालकांनी स्वतःच्या इच्छा मुलांवर लादू नये त्यांच्या आवडीप्रमाणे मुलांना प्रोत्साहन द्यावे. उत्तम शिक्षण घेतल्यानंतर आपल्या देशाचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले. प्रा. सत्यजित खांडगे यांनी ही मनोगत व्यक्त केले.

व्याख्यात्यांचा परिचय रो.दशरथ जांभूळकर यांनी केला , कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन लक्ष्मण मखर यांनी तर सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी व प्रकल्प प्रमुख गणेश ठोंबरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व स्वामी विवेकानंद स्कूलच्या (Talegaon Dabhade) सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.