Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी. फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade ) येथील इंद्रायणी विद्या मंदिर संचलित, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वच्छता, प्लास्टिक मुक्त अभियान, माझी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश संकलन, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

PCMC : यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईला अजूनही मुहूर्ताची प्रतीक्षा

फार्मसी महाविद्यालयात रा.से.यो. युनिटने 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा केला. पहिल्या दिवशी रा.से. यो. युनिटने महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्वयंसेवकांनी प्लास्टिक गोळा करून परिसराला प्लास्टिकमुक्त वातावरण बनवले.

 

दुसऱ्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे यांनी “माती माझा देश – अमृत कलश संकलनाचे’’ उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी, महेश महाजन, संस्थापक अध्यक्ष फ्रेंड्स नेचर क्लब यांनी 75 औषधी उपयुक्त रोपांची लागवड केली. त्यांनी औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि त्याचा उपयोग रा.से. यो. स्वयंसेवकांना सांगितला. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त निरुपा कानिटकर यांनी रा.से. यो. टीमचे कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे व शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.गणेश म्हस्के यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉ. योगेश झांबरे, रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी यांनी समन्वय केले. अंकिता जतकर आणि जयराज संकुंडे, रा.से. यो. विद्यार्थी समन्वयक सक्रिय सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.