Talegaon Dabhade : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी तुषार भेगडे यांची निवड

कार्याध्यक्षपदी विशाल पवार

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी तुषार सुरेश भेगडे यांची तर कार्याध्यक्षपदी विशाल पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी तळेगाव दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली आहे. पार्थ पवार आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते पदाधिकऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे,ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, युवक शहराध्यक्ष आशिष खांडगे, अक्षय दाभाडे, महिला अध्यक्षा सुनीता काळोखे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंन्द्र किल्लावाला, महेश फलके यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तळेगाव स्टेशन येथील रिक्रिएशन हाॅलमध्ये आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. स्टेशन आणि गाव विभागासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या निवडीच्या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी नूतन पदाधिका-यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले.

अध्यक्ष – गणेश काकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष – तुषार भेगडे.
उपाध्यक्ष –दिनेश शहा, बाबासाहेब मुलाणी, राकेश खळदे, सचिन उनकुले, दिनकर निवृत्ती भेगडे, राजेंद्र दाभाडे, मिथुन दाभाडे, महेश फलके, दीपक आगळमे.

कार्याध्यक्ष – विशाल पवार.
चिटणीस – संदेश जाधव, अशोक आगळे, सुनील दाभाडे, विशाल उभे, सुनीतीकुमार जांभळे, राजू काटे.

सरचिटणीस – राजेंद्र परभणे, प्रेमनाथ परदेशी, अभिजीत वैद्य, राजेश बारणे, महेश निंबाळकर.
वरिष्ठ सल्लागार – आयुब सिकिलकर.
सल्लागार – रामभाऊ गवारे, अशोक काकडे, शिवाजी आगळे, दिलीप चौधरी.
खजिनदार- गोपाळ परदेशी.
सहखजिनदार – केशव कुल.
संपर्क प्रमुख – किशोर कवडे, मिलिंद अच्युत, सूर्यकांत काळोखे.
प्रसिद्धी प्रमुख – पराग गायकवाड, निरंजन जहागीरदार.
प्रवक्ता – नंदकुमार कोतुळकर.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तळेगाव दाभाडे

अध्यक्ष – आशिष खांडगे,कार्याध्यक्ष – मितुल भेगडे.
वरिष्ठ उपाध्यक्ष – मंदार करंडे.
उपाध्यक्ष – हर्षद पवार,चेतन कवडे,केदार शिळीमकर,सुहास सोनवणे,विद्युत खान,निशांत शहा.

सरचिटणीस- हर्षद आगळे,
चिटणीस – दिनेश गोरे,योगेश कुंभार,ऋषीकेश भेगडे,ऐनाज शेख,सागर दिघे,दीपक काळाहाणे.
सहचिटणीस – ललीत पवार.
प्रसिद्धी प्रमुख – प्रसाद बारमुख,
संपर्क प्रमुख – निखिल शहा, चेतन पटवा, फारूक शेख.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

अध्यक्ष – अक्षय दाभाडे.
कार्याध्यक्ष – हर्षवर्धन दाभाडे,
उपाध्यक्ष –पुष्पक दाभाडे, आदित्य म्हाळसकर, सौरभ दाभाडे.
सरचिटणीस – मित्तल चोरघे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.