Maval : पवना धरण 42.18  टक्के भरले !

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 42.18  टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे. गेल्या 24 तासात या परिसरात 33 मिमी पाऊस झाला असून 1.29 टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 1075 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 28.72 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी आजमितीला धरणात 56.38 टक्के पाणीसाठा होता. ‌

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.