Talegaon Dabhade News : उद्योजक राजेंद्र शेळके यांचे निधन 

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन (म्हाळसकरवाडी) येथील झंकार मंडपचे संचालक व उद्योजक राजेंद्र बाळासाहेब शेळके (वय 55) यांचे रविवारी (दि.12) अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुली असा परिवार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका संगीता राजेंद्र शेळके यांचे ते पती तर मावळचे आमदार सुनील शेळके यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.