Pimple Saudagar News : रोझ आयकॉन सोसायटीत कंपोस्टिंग प्रक्रिया प्रकल्प

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन सोसायटीत कंपोस्टिंग प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामध्ये पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे.

या कंपोस्ट खत प्लांटमध्ये झाडांचा पालापाचोळा, शेणखत, चहापत्ती या नैसर्गिक गोष्टींचेच मिश्रण करून खत तयार केले जाते. याला शासनाचा टेस्टिंग रिपोर्ट देखील मिळाला आहे. हे खत सोसायट्यांच्या किंवा घरांच्या छतावर आपण जी फळबाग किंवा भाजीपाला वैगेरे तयार करतो त्यामध्ये हे खत वापरले जाते. तसेच शेतासाठी देखील हे खत फार उपयुक्त ठरते.

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी या प्लांटला भेट देऊन माहिती घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे, पंकज देशमुख, गौरव पाटील, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, मोहित आगरवाल, शशिकांत शर्मा, विकास काटे, दिनेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कंपोस्ट प्रकल्प प्लांटमुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज आहे. घरातील आणि आपल्या आसपासच्या परिसरातील वेस्ट वाटणारा कचरा देखील आपल्या किती फायद्याचा आहे हे या प्लांटमुळे दिसून येते. हा उपक्रम राबविण्यासाठी जर काही मदत लागलीच तर उन्नती सोशल फाउंडेशन सहकार्य करेल. असे यावेळी भिसे म्हणाल्या .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.