Talegaon Dabhade News : तळेगाव येथे 9 व10 जानेवारी रोजी होणार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

एमपीसी न्युज – पंचायत समिती मावळ तालुका शिक्षण विभागाच्या वतीने 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 9 व 10 जानेवारी रोजी तळेगाव जनरल हॉस्पिटल जवळ, मेडिकल कॉलेज कॅम्पस मध्ये (Talegaon Dabhade News) संपन्न होणार आहे. विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा 9 जानेवारी रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते तर विज्ञान प्रदर्शनातील बक्षीस वितरण समारंभ 10 रोजी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी दिली.

 

विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा 9 जानेवारी रोजी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एमआयटी ग्रुपच्या सेक्रेटरी स्वाती साठे भूषविणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनातील बक्षीस वितरण समारंभ  10 रोजी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते होणार असून  मायमर मेडिकल  कॉलेजच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नांगरे (कराड) या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

 

Pune News :अंकोरवाट या छायाचित्र प्रदर्शनाद्वारे रसिकांनी अनुभवले बौद्ध व हिंदू मंदिरांचा सौंदर्य  

 

 

सदर विज्ञान प्रदर्शन मावळ तालुका माध्यमिक,उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ व यम आय टी जुनियर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आले असून ते एमआयटी ज्युनिअर कॉलेज, तळेगाव जनरल हॉस्पिटल जवळ, मेडिकल कॉलेज कॅम्पस (Talegaon Dabhade News) मध्ये संपन्न होणार आहे.

 

यावेळी माध्यमिक विभागाच्या जिल्हाधिकारी सुनंदा वखारे, संध्या गायकवाड,मावळ तालुका गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती  मावळ सुदाम वाळुंज, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड,पुणे जिल्हा विद्या विज्ञान संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड सह मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान मावळ तालुका (Talegaon Dabhade News) मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिखरे व सहकाऱ्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.