Talegaon Dabhade News : सीआरपीएफ कॅम्प तळेगाव येथून तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज – सीआरपीएफ कॅम्प तळेगाव दाभाडे येथून 26 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता एक तरुण घरातून काहीही न सांगता निघून गेला. त्याचा शोध घेतल्यानंतर तो सापडला नसल्याने नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली आहे.

 

काशिनाथ लालसिंग नाईक (वय 60, रा. सीआरपीएफ कॅम्प, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा सुनील काशिनाथ नाईक (वय 31) हा बेपत्ता झाला आहे.

 

26 मार्च रोजी सुनील हा घरच्यांना काहीही न सांगता सायंकाळी सात वाजता घरातून बाहेर गेला. तो परत आलाच नाही. सुनील रंगाने निमगोरा, उंची पाच फूट आठ इंच, अंगात निळ्या रंगाची जीन्स, गोल्डन रंगाचा शर्ट, पायात राखाडी रंगाची सँडल घातलेला आहे.

 

सुनील बद्दल कोणास काही माहिती मिळाली तर त्यांनी काशिनाथ नाईक यांच्याशी (9623047887) संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.