Talegaon Dabhade : प्रभावती कोळी यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका प्रभावती बाबुराव कोळी (वय 75)
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती,मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रभावती कोळी यांनी जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्यातील शिवणे, माळवाडी आणि वडगाव येथील शाळांमध्ये सुमारे 31 वर्षे सेवा केली.
त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.

प्रभावती कोळी या तळेगाव दाभाडे सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष बाबुराव आबा कोळी यांच्या पत्नी तर मुंबई येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल बाबुराव कोळी तसेच इंदोरी येथील जिल्हा परिषदेच्या उपशिक्षिका सुजाता भारत शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.