Talegaon Dabhade : रुडसेट संस्थेच्या शेळीपालन प्रशिक्षण वर्गाला 35 प्रशिक्षणार्थींचा सहभाग

एमपीसी न्यूज- कोणताही व्यवसाय करताना आलेल्या संधीचा योग्य उपयोग केला तर निश्चितच व्यवसाय घडतो असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील रुडसेट संस्थेच्या वतीने आयोजित शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी दाभाडे बोलत होत्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती शिंदे, संस्थेचे संचालक जयंत घोंगडे उपस्थित होते.

जयंत घोंगडे यांनी प्रशिक्षण हे एक मार्ग असून व्यवसाय करताना आर्थिक उन्नती करून समाजात पुढे न्यावे व आर्थिक साक्षरता निर्माण करुन आपला नावलौकिक वाढवावा संस्था आपल्या सोबत कायम असून विविध कर्ज प्रकरणासाठी योग्य मार्गदर्शन कधीही उपलब्ध होईल असे आश्वासन दिले.

निरोप समारंभ प्रसंगी प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल प्रशिक्षणार्थींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके व संस्थेचे साहित्य देण्यात आले. दहा दिवसांमध्ये प्रशिक्षण हे फक्त शिक्षण नसून एक व्यावसायिक घडवण्याचे जिवंत उदाहरण आहे असे प्रतिपादन प्रशिक्षणार्थी मोहम्मद पट्टेवार यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमास पुणे,सातारा, नाशिक यासारख्या जिल्ह्यातून जवळजवळ 35 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संस्थेमार्फत विनामूल्य प्रशिक्षणा बरोबर भोजन, चहा, नाश्ता व प्रकल्प भेट तसेच विविध कर्ज योजनेची माहिती, विमा योजना यांचे सखोल ज्ञान देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशिक्षक हरीश बावचे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगिता गरुड, दिनेश नीळकंठ, रवी घोजगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.