Talegaon Dabhade : जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कदम यांच्या प्रयत्नातून मावळात विविध विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई कदम यांच्या विशेष प्रयत्नातुन टाकवे – वडेश्वर मतदार संघासाठी एकूण 59 लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती शोभाताई कदम यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागातुन टाकावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ड्रेनेज दुरुस्तीसाठी 12 लाख, नागाथली उपकेंद्रांची दुरुस्ती करण्यासाठी 9 लाख व गोवित्री उपकेंद्राची दुरुस्ती करण्यासाठी 8 लाख असे एकूण 29 लाख खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे कदमवाडी येथील सभामंडप बांधणे, मंगरुळ येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, भोयरे येथील रस्त्याचे मजबुती करण, नागाथली येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, नवीन उकसान येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, सुदुबंरे येथे गटर बांधकाम करणे, नेसावे येथे सभामंडप बांधणे, निळशी येथे सभामंडप शुशोभीकरण करणे, कांब्रे नामायेथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, कशाळ येथे रस्ता दुरुस्त करणे, इंगळुन येथे रस्ता दुरुस्त करणे अशा विविध विकास कामांसाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.